• July 2, 2023
  • No Comment

बनावट प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार उघडकीस, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार उघडकीस, दोघांवर गुन्हा दाखल

    पुणे: बनावट प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

    सुजित शिवाजी साळुंखे (वय 25 रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय 26, रा. वडोली, ता.माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुर्नवसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासविले होते. भरती प्रक्रियेत आरोपी साळुंके, माने यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *