• July 2, 2023
  • No Comment

प्रेमविवाह केला म्हणून तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाच्या कुटुंबियांना मारहाण

प्रेमविवाह केला म्हणून तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाच्या कुटुंबियांना मारहाण

    थेरगाव: पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना थेरगाव येथे घडली.

    संभाजी शेलार (वय 51), रामचंद्र शेलार (वय 47), तीन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती कामावरून घरी आले असता फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपींची मुलगी हे लग्न करून कोठेतरी निघून गेले .या कारणावरून आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. आमची मुलगी कोठे आहे, अशी फिर्यादीकडे विचारणा केली. त्यावर आपल्याला काहीही माहिती नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती आणि सासूला मारहाण केली. माझी मुलगी मिळाली नाही तर तुला व तुझ्या पतीला बघून घेतो, अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *