- July 2, 2023
- No Comment
*एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोकसेवक रंगेहात अटक, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: शिल्लक रजेच्या बिलाचा चेक देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील लोकसेवकाला रंगेहात पकडण्यात आले. पुणे मनपाच्या आवारात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी 61 वर्षीय पुरुषाने तक्रार दाखल केली होती.
लोकसेवक प्रवीण दत्तात्रय पासलकर (वय 50 वर्षे, रा.धनकवडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपी पुणे मनपा वर्ग-4 येथे बिगारी म्हणून कार्यरत आहे.
सविस्तर माहिती अशी, की तक्रारदार हे पुणे मनपा येथे आरोग्य विभागात मुकादम या पदावर कार्यरत होते. त्यांनी सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या शिल्लक अर्जित रजेचे बिलाचा देण्यासाठी अर्ज केला होता.
पण त्यांच्या या शिल्लक रजेचा चेक देण्यासाठी आरोपी प्रवीण पासलकर यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ती लाच रक्कम मनपा आवारात स्वीकारली असता आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुढील तपास ला. प्र. वि. पुणे येथील पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.