- July 2, 2023
- No Comment
पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! कोणाला होणार फायदा?
30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभाग लिंकिंग डेडलाइन वाढवणार की नाही याबद्दल अनेक लोक संभ्रमात आहेत.सध्या, अंतिम मुदतीबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अपडेट आलेली नाही.
परंतु प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी उशिरा एका ट्विटमध्ये आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्याचे प्रकार घडले आहेत.
आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की अशी प्रकरणे समोर आली आहेत, जिथे पॅन-आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.
अशा प्रकरणांमध्ये, आयकर पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ‘ई-पे टॅक्स’ टॅबमध्ये चलन भरण्याची स्थिती तपासली जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्याच्या प्रक्रियेसह पुढे जाऊ शकतो.
आयकर विभागाने दिलासा दिला
विभागाने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की ज्या प्रकरणांमध्ये पॅन कार्डधारकाने पेमेंट केले आहे आणि संमती दिली आहे, परंतु 30 जून 2023 पर्यंत लिंक केलेले नाही, त्यांच्या प्रकरणांचा विभागाकडून विचार केला जाईल आणि दिलासा दिला जाईल
आयकर विभागाने सांगितले की, आधार पॅन लिंक करण्यासाठी चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नाही. विभागाने म्हटले आहे की पॅन धारकाने यशस्वी पेमेंट पूर्ण केल्यावर, त्यांना चालानच्या प्रतीसह एक ईमेल पाठविला जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना ते वेगळे डाउनलोड करण्याची गरज नाही.
नियम:
पॅनला आधारशी लिंक करण्याचा कायदा 1 जुलै 2017 पासून लागू झाला आहे. काल म्हणजेच 30 जून 2023 ही लिंक करण्याची शेवटची तारीख होती.
अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती 30 जून 2023 पर्यंत आपले आधार पॅनशी लिंक करू शकली नसेल आणि नंतरच्या तारखेला लिंक करू इच्छित असेल, तर आयकर विभागाला दंड भरल्यानंतर दोन्ही लिंक केले जाऊ शकतात.