- July 2, 2023
- No Comment
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार ०२ वर्षासाठी तडीपार
लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, वय २२ वर्षे, रा. गोकुळ पार्क रामचंद्र कॉलेज बकोरी फाटा वाघोली ता. हवेली जि. पुणे व टोळी सदस्य अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, वय २३ वर्षे, रा. गाडे वस्ती बकोरी फाटा वाघोली ता. हवेली जि. पुणे यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४,
पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, बकोरी फाटा, लोणीकंदतसेचआसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणा-या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास
धोका निर्माण करणा-या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच
सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस
उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त साो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त साो. श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो. श्री. संजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारूती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, यांनी
केली आहे. सदरचे तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस
स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, श्री विश्वजित काइंगडे यांनी केले आहे.