• October 20, 2023
  • No Comment

ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; दरमहा किती कमवायचा?

ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; दरमहा किती कमवायचा?

    ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. सोमवारपर्यंत ललितला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस ललित पाटील आणि ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. नाशिकमध्ये उभारलेल्या ड्रग्जच्या कारखान्यातून ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटील महिन्याला ५० लाखांची कमाई करत असल्याचे उघड झाले आहे
    नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे. या कारखान्यात दरमहा ५० किलो एमडी तयार केले जायचे. त्यातून पाटील बंधुंनी लाखोंची कमाई दर महिन्याला केली. हे पैसे सोन्यात गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. ललितचा भाऊ भूषण आणि मित्र अभिषेक बलकवडे याच्या मदतीने कारखाना उभारण्यात आला. २०२१ पासून हे सुरू होते. ५ ऑक्टोबरला मुंबईतील साकिनाका पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत जवळपास २००-३०० कोटींचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर हा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला. एमजी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

    नाशिकच्या या कारखान्यातून एमडी ड्रग्जचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह इतर राज्यातील अनेक शहरांमध्ये केला जायचा. ड्रग्स पेडलर्सच्या माध्यमातून ही साखळी ड्रग्स विक्री करत होती. यातून ललित आणि भूषण पाटीलला दरमहा ५० लाख रुपये कमाई मिळायची. आतापर्यंत पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. आणखीही काहीजण पोलिसांच्या रडारवर आहे. त्याचसोबत आणखी मोठी नावे या प्रकरणात समोर येऊ शकतात असं बोलले जात आहे
    सुरुवातीच्या काळात या कारखान्यात कमी प्रमाणात एमडी बनवले जायचे. परंतु कालांतराने मागणी वाढल्याने पुरवठाही वाढवण्यास आला. एमडी कारखान्यात तयार केल्यानंतर ते विक्री करण्याची जबाबदारी २-३ जणांवर होती. एमडी ड्रग्जची किंमत जास्त असली तरी त्याची तरुणांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्याचसोबत अनेक पार्ट्यांमध्ये एमडी ड्रग्ज वापरले जाते. त्यामुळे ललित आणि भूषणने एमडी बनवण्याचं तंत्र शोधून कारखानाच काढला. आता कमावलेल्या पैशातून ललितने कुठे आणि कशी गुंतवणूक केली याचा पोलीस शोध घेत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *