• October 20, 2023
  • No Comment

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी केली अटक

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी केली अटक

    पुणे : ‘मी येरवड्याचा भाई आहे, तुला तर आज संपवूनच टाकतो असे सांगत चोवीस वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने डोक्यावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. समीर मकरंद सावंत (वय 22 रा.सुभाषनगर येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    याप्रकरणी अमेय जगताप (वय 24 रा; सुभाषनगर नवी खडकी येरवडा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सावंतवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता नवी खडकी मधील नेताजी शाळेजवळील किराणा दुकानासमोर घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेताजी शाळेजवळील किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी गेले असताना त्यांच्याच परिसरात राहाणा-या आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की करुन इथे थांबायचे नाही, मी बोलतो ना , तर ऐकायचे, फिर्यादी याने विचारणा केल्याचा राग मनात धरुन, तू मला उलटे बोलतो का, तुला माहिती नाही का मी येरवड्याचा भाई आहे. तुला तर आज संपवूनच टाकतो असे बोलून त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्याकडील हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *