• October 20, 2023
  • No Comment

पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्याची एका बिल्डरला जबर मारहाण

पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्याची एका बिल्डरला जबर मारहाण

    पुणे : पुणे शहरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बिल्डरला मारहाण केल्याची ही घटना आहे. या घटनेनंतर पटेल समाज आक्रमक झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात ही घटना घडली आहे. यानंतर उद्योजक आणि बिल्डरांबरोबर पटेल समाजातून संताप व्यक्त होत आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचे लक्षात येताच आमदार महेश लांडगे पुढे आले आहे. त्यांनी पटेल समाजाची माफी मागितली आहे
    दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आणि भाजप नेते नितीन बोऱ्हाडे यांच्यासंदर्भातील हे प्रकरण आहे. नितीन बोऱ्हाडे यांनी जमिनीच्या व्यवहारातील वादातून बिल्डर नरेश पटेल यांना जबर मारहाण केली. पिंपरी चिंचवड मनपाच्या आवारातच पटेल यांना लाथाबुक्क्यांनी सर्वांसमोर मारहाण झाली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर पटेल समाज आक्रमक झाला आहे.

    काय आहे वाद
    नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते अन नरेश पटेल यांची जमीन शेजारीशेजारी आहे. त्या जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून वाद आहे. त्यावर सुनावणी पिंपरी चिंचवड मनपात झाली. त्या सुनावणीनंतर बोऱ्हाडे यांनी पटेल यांना मारहाण केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *