• October 20, 2023
  • No Comment

उसने दिलेल्या साडेतीन लाखांच्या बदल्यात १४ लाखांची खंडणी

उसने दिलेल्या साडेतीन लाखांच्या बदल्यात १४ लाखांची खंडणी

    पुणे : पैशांची गरज असल्याने एका महिलेने दोन जणांकडून तीन लाख ७० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने महिना १६ टक्के व्याजाने उधारीवर घेतले. घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरदेखील १४ लाख रुपयांची मागणी करून जबरदस्ती केल्याप्रकरणी एका महिलेसह एका इसमाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कविता धीरज अगरवाल (३०, रा. खडकी) यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे
    ममता विशाल गोयल आणि नीलेश राम बहिरट (३२, रा. बोपखेल) या आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी कायदा, तसेच अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे. संबंधित आरोपी ममता गोयल आणि नीलेश बहिरट यांच्याकडे सावकारी परवाना नसतानादेखील त्यांनी अगरवाल यांना पैशाची गरज असल्याचे ओळखून वेळोवेळी नीलेश बहिरट यांच्या खात्यावरून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख ७० हजार रुपये पाठवले. त्या बदल्यात अगरवाल यांनी मुद्दल आणि व्याजापोटी एकूण पाच लाख ४८ हजार रुपये रोख व ऑनलाइन पद्धतीने परतफेड केली. मात्र, अगरवाल यांच्याकडून जादा १४ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. ती वसूल करण्यासाठी आरोपी ममता गोयल हिने अगरवाल यांची कार व सहीचा कोरा बनावट चेक जबरदस्तीने घेऊन जात फोनवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात संबंधित तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *