• October 20, 2023
  • No Comment

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करून माहेराहून पाच तोळे व ५० हजार आणले नाहीत म्हणून अंगाला चटके

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करून माहेराहून पाच तोळे व ५० हजार आणले नाहीत म्हणून अंगाला चटके

    सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करून माहेराहून पाच तोळे व ५० हजार आणले नाहीत म्हणून अंगाला चटके देऊन सासू,सासरे, नवऱ्याकडून मारहाण करण्याचा प्रकार इंदिरानगर लोहगाव येथे घडला. या प्रकरणात दिराकडून विनयभंग करण्यात आल्याने फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती रवि बालाजी धोत्रे (२६ ), सासरे बालाजी शेटीबा धोत्रे (५६), सासू सुंदरा बालाजी धोत्रे (५१), दीर बालाजी धोत्रे (२४) ही आरोपींची नावे असून सर्व बर्माशेल इंदिरानगर साईबाबा मंदिर लोहगाव येथे राहतात. त्या महिलेचे लग्न झाल्यापासूनच सासरच्यांकडून छळ सुरू होता. तसेच दिराने घरात येऊन त्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून विनयभंग केला व याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
    या प्रकरणी सर्व आरोपी फरार असून पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप कपरे करत आहेत. दोषींना तत्काळ अटक करावी, अन्यथा जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *