• October 20, 2023
  • No Comment

मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’!

मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’!

पुणे : नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच हडपसर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून 70 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फिर्यादी हे 14 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मांजरी रोडवरील नवीन ओव्हर ब्रिजवर एकटेच मोबाईल बघत थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एकाने त्यांना पाठीमागून पकडून दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकाऊन घेतला. त्यावेळी आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत, तु जर पोलिसांकडे तक्रर केली तर मांजरी मध्ये राहु देणार नसल्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. त्यावेळी युनिट पाचच्या पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल बाळासाहेब आडेगावकर (वय-30 रा. गोपाळपट्टी मांजरी बु. पुणे), रोहन भगवान थोरात (वय-20 रा. मांजरी बु.), गणेश गौतम कोरडे (वय-22 रा. म्हातोबाची आळंदी), आशितोष विक्रम गजरे (वय-22 रा. रंगीचा ओढा, मांजरी), मंगेश गणेश मोरे (वय-22 रा. कल्याणी स्कुलजवळ, मांजरी) यांना सापळा रचून अटक केली.

आरोपी अमोल आडेगावकर याने सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन हडपसर, मांजरी परिसरात दहशत
माजवली आहे. टोळीने वर्चस्व वादातून तसेच आर्थिक फायद्यासाठी संघटीत तसेच संयुक्तपणे गुन्हे केले आहे.
या गुन्हेगारी टोळीने खुन करणे, शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घरफोडी चोरी, जबरी चोरी,
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून पैसे मागणे, लहान मोठे व्यवसायिक
तसेच पथारीवाले यांना दमदाटी करणे अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत
हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी परिमंडळ- 5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, सहायक पोलीस निरीक्षक सारीका जगताप
पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे यांच्या पथकाने केली

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *