- October 20, 2023
- No Comment
हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे (हवेली क्रमांक 24) सहदुय्यम निबंधक एस.पी. भातंबरेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. खरेदीखताच्या दस्तातमध्ये तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे मुद्रांक शुक्ल कमी आकारल्या प्रकरणी भातंबरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांनी प्रस्तुत केले
आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला (हवेली क्रमांक 24) 12 ऑक्टोबर रोजी पुणे शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांची अचानक भेट दिली. तसेच हिंगाणे यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाकडून हवेली क्रमांक 24 या कार्यालयाची चालू वर्षीतील सप्टेंबर आणि 11 ऑक्टोबरपर्य़ंत नोंदवण्यात आलेल्या दस्तांची रॅण्डम पद्धतीने तापसणी करण्यात आली. यामध्ये भातंबरेकर यांनी 11 सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या एका खरेदीखताच्या दस्तात 24 कोटी 90 लाख 15 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्कची रक्कम कमी आल्याचे दिसून आले. यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी हा प्रकार 17 ऑक्टोबरला राज्य शासनाला कळवला होता.
त्यानुसार भातंबरेकर यांनी खरेदीखताच्या दस्तात मुद्रांक शुल्क न आकारता शासनाचा महसूल बुडवल्याचे समोर आले.
त्यामुळे भातंबरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 19 ऑक्टोबर पासून पुढील आदेश येईपर्यंत
त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत भातंबरेकर यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी,
गडचिरोली असणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगिशिवाय त्यांना मुख्यलय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे