• October 20, 2023
  • No Comment

नात्याला काळीमा फासणारी घटना बदनामी करण्याची धमकी देऊन चुलतीवर लैंगिक अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना बदनामी करण्याची धमकी देऊन चुलतीवर लैंगिक अत्याचार

    पुणे : नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. बदनामी करण्याची धमकी देऊन पुतण्याने चुलतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहे. याप्रकरणी पुतण्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रील 2016 ते डिसेंबर 2019 दरम्यान कसबा पेठेत घडला आहे.
    याबाबत 37 वर्षाच्या महिलेने गुरुवारी  पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा पुतण्या आहे. त्याने फिर्यादी यांच्यासोबत लगट करण्याचा
    प्रयत्न केला असता त्या ओरडल्या. त्यावेळी आरोपीने मी तुझ्या मुलींना व नवऱ्याला तसेच सगळ्यांना सांगेन की तूच
    मला वरती बोलावून घेतले. फिर्यादी यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. तसेच त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळले. आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने गुरुवारी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *