• September 1, 2023
  • No Comment

मुलीचा विनयभंग करून पत्नीला जबर मारहाण करीत खून करणाऱ्या नराधम बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक, पुण्यातील धक्कादायक घटना…!!!

मुलीचा विनयभंग करून पत्नीला जबर मारहाण करीत खून करणाऱ्या नराधम बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक, पुण्यातील धक्कादायक घटना…!!!

    पुणे- मुलीचा विनयभंग करून पत्नीला दांडक्याने जबरी मारहाण करत पायाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरातील आव्हाळवाडी येथे घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी नराधम बापा विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खून, विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर गुन्ह्यातील आरोपी नराधम बापाने दोन दिवसापूर्वी स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा दारू पिऊन विनयभंग केला. त्यामुळे पीडित मुलीच्या आईचे तिच्या वडीलांसोबत वादविवाद झाले होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाराधम पित्याने पुन्हा आईसमोरच पीडित मुलीचा विनयभंग केला. त्याला तिने विरोध केल्यामुळे आरोपीने तिला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. पहाटे चार वाजेपर्यंत मारहाण करीत तिचे डोके भिंतीवर आपटून तिला जमिनीवर खाली पाडून गळ्यावर पाय दिला. एवढ्यावरच न थांबता घरातील दुचाकी मधील पेट्रोल काढून आई तुझ्या अंगावर तसेच गुप्तांगावर टाकून तुला जाळून मारतो अशी धमकी देत जबरी मारहाण करीत तिला जीवे ठार मारले. दुर्दैवाने उपचारापूर्वीच सदर महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व आंमलदार यांनी तातडीने धाव घेतली. तसेच नराधम आरोपी पित्याला लागलीच ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, श्रीमती सीमा ढाकणे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. नराधम आरोपी पित्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.
    मुलीचा विनयभंग करून पत्नीला जबर मारहाण करीत खून करणाऱ्या नराधम बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक, पुण्यातील वाघोली हद्दीतील धक्कादायक घटना…!!!

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *