• September 1, 2023
  • No Comment

सासूकडून पैसे हवे होते म्हणूनखंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे रक्षाबंधनाच्या दिवशी अपहर

सासूकडून पैसे हवे होते म्हणूनखंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे रक्षाबंधनाच्या दिवशी अपहर

    पुणे जिल्ह्यातील या जावायाने असे काही प्रकार केले की त्याचा ताप सर्वांना झाला. सासू, मेहुणी अन् इतर कुटुंब वेठीस धरले गेले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी काही तासात या प्रकरणाचा छळा लावला. ही घटना रक्षाबंधनाच्या दिवशी घडली. या प्रकरणात जावायास अटक करण्यात आली आहे.

    पुणे शहराजवळील पिंपरी- चिंचवडमध्ये जावयाची करामत बघायला मिळालीय. या ठिकाणी असलेल्या ४५ वर्षीय सचिन मोहिते याला सासूकडून दहा लाख रुपये हवे होते. खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे रक्षाबंधनाच्या दिवशी अपहरण केले. त्यांना वाघोलीच्या घरी डांबून ठेवले. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने सचिन मोहिते यांच्यासह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली. नातींचे अपहरण केल्याने सासू पैसे देईल, या उद्देशाने सचिन मोहिते याने अपहरण कट रचला. परंतु पोलिसांचा तपासात हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले
    सचिन मोहिते याची मेव्हणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८ , रा. रहाटणी) हिने पोलिसांत फिर्याद दिली होती. तिची दोन वर्षांची मुलगी आणि सचिन मोहिते याची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळवले. त्यानंतर वाकड पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला. त्यानंतर सचिन मोहिते याच्या जबाबात विसंगतीमुळे पोलिसांना संशय बळावला आणि प्रकार उघड झाला. काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *