- August 31, 2023
- No Comment
पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारा रेकॉर्ड वरिल मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद
पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. गुन्हयाचा तपास युनिट ६, मार्फत चालू असताना नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरिल गुन्हेगार सोनू ऊर्फ संजिव टाक रा. हडपसर पुणे याने केलेलाअसून तो मांजरी बुद्रुक स्मशानभुमीजवळ मांजरी पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदारयांनी सापळा रचून सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक वय २८ वर्षे रा. स.नं. १४, शाळा नंबर १०० मागे, तुळजा भवानीवसाहत, गाडीतळ हडपसर पुणे यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे
अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा साथीदार पंकजसिंग दुधानी रा. अंबरनाथ याचेसह केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्या, चांदीचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २,६३,५००/- रु. किमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
आरोपी सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक यास मा. न्यायालयाने दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे. नमूद गुन्हयातील सोन्याची अंगठी त्याने त्याची आई नामे मिना कपूरसिंग टाक हिला दिल्याने तीचाही गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद गुन्हयाचा तपास मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त,
मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर,
सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रजनीश निर्मल,
पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे,
बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन
पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.