- August 31, 2023
- No Comment
वारजे माळवाडीत एका दिवसात ०२ पिस्टल व ०७ जिवंत काडतुसे केले जप्त
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे आगामी दहिहंडी सणानिमीत्त पोलीस स्टेशन हद्दित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार, श्रीकांत भांगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन तपास पथकाचे अधिकारी नरेंद्र मुंढे व स्टाफ यांचे सोबत धनगरबाबा बसस्टॉपचे मागे,एनडीए ग्राउंडमध्ये सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांचेपैकी सराईत गुन्हेगार सुरज शिवाजी भरडे, वय – २३ वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, बौध्द विहार शेजारी,राहुलनगर, शिवणे, पुणे याचेकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त केले आहे. तसेच त्याचे सोबत असणा-या विधीसंघर्षीत बालकाकडुन एक लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई चालू असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार, विजय भुरुक यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन निगराणी पथकाचे अधिकारी पोउपनिरी विशाल मिंडे व स्टाफ असे वारजे स्मशानभुमी समोरील पुलाखाली सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांचे पैकी
इसम नामे अनिकेत अनुरथ आदमाने, वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, पांडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, पुणे याचेकडुन एक देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतूसे जप्त केले आहे. तसेच त्याचेसोबत असणा-या विधीसंघर्षीत बालकाकडुन एक लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सतर्कतेमुळे एकाच दिवशी दोन पिस्टल व ०७ जिवंत काडतूसे जप्त करून गंभीर गुन्हा घडण्यास प्रतिबंध केला आहे.
सदरची कामगीरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर,श्री.भिमराव टेळे, वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल जैतापुरकर,
पोलीस निरीक्षक,(गुन्हे) श्री अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक,
नरेंद्र मुंढे, विशाल मिंडे, पोलीस अंमलदार, प्रदिप शेलार, अमोल राऊत, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे,
विक्रम खिलारी, अजय कामठे, अमोल सुतकर व राहुल हंडाळ यांनी केलेली आहे.