- August 31, 2023
- No Comment
पनीर खाताय? सावध व्हा, पुणे पोलिसांनी उघडले रॅकेट
पुणे : श्रावण महिना अनेक सण आणि उत्सवाचा महिना आहे. या महिन्यात गणपती, गौरी या सारखे सण येतात. यामुळे घराघरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची मोठी विक्री सण उत्सवात असते. या काळात पनीरला विशेष मागणी आहे. या मागणीचा गैरफायदा काही विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. पुणे शहरात यासंदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पनीर खात असाल तर सावध व्हा, असे म्हणावे लागणार आहे
पुणे शहरात बनावट पनीरची विक्री होत होती. बनावट पनीर शहरातील अनेक दुकाने आणि हॉटेलमध्ये विकले जात होते. यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल 4 हजार 970 किलो बनावट पनीरचा साठा जप्त केला आहे. एकूण दहा लाख रुपये किंमतीचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. ऐन सणसुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पनीरचा बनावट साठा जप्त झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोठून येत होते बनावट पनीर
पुणे पोलिसांनी कात्रज परिसरात कारवाई करुन पनीरचा साठा जप्त केला. हा साठा कोठून आला होतो, याचा तपास केल्यानंतर परराज्यातील रॅकेट उघड झाले. कर्नाटकामधून पुणे शहरात बनावट पनीर आणून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती उघड झाली
कसे ओळखाल पनीर बनावट आहे…
बनावट पनीर कडक असते तर भेसळ नसलेले पनीर नरम असते. यामुळे पनीर घेताना तो असली आहे की नकली चेक करुन घ्या.
पनीर दूधापासून तयार केला जातो. यामुळे पनीरची चव दूधासारखी असते. पनीरमध्ये भेसळ असेल तर त्याची चव बदलते. त्यामुळे ते भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होते.
पनीर तपासण्यासाठी आयोडीन टिंचर हा एक पर्याय आहे. पनीर पाच मिनिटे गरम करुन आयोडीन टिंचर टाकावे. त्यानंतर त्याचा रंग निळा झाला तर ते भेसळयुक्त पनीर आहे