• August 31, 2023
  • No Comment

मोबाईल विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या फ्लिपकार्टच्या चार कर्मचाऱ्यांना अटक

मोबाईल विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या फ्लिपकार्टच्या चार कर्मचाऱ्यांना अटक

    पुणे : पुण्यात फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या फ्लिपकार्टच्या चार कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून 4.5 लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे 19 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. फ्लिपकार्टचे कर्मचारीच फसवणूक करत होते. ऑर्डर केलेल्या मोबाईलच्या बॉक्समध्ये बंद मोबाईल, फरशीचे तुकडे आणि साबण ठेवून मोबाईल विक्रेत्यांची दोघांची फसवणूक करायचे. अखेर या कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    एका दुकानमालकाच्या तक्रारीनंतर घटना उघड
    एका मोबाईल दुकान मालकाने 7.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दुकानदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. अनेक ग्राहक बड्या कुरिअर कंपन्यांमार्फत मोबाईल खरेदी करतात. तसेच त्या कुरिअर कंपन्या मोबाईल दुकानात ऑर्डर नोंदवून ग्राहकांना मोबाईल घरपोच देतात, हे माहिती असल्यामुळे पोलिसांनी एक कुरिअर कंपनी गाठली.

    चौघांना अटक, 19 मोबाईल जप्त
    कुरिअर कंपनीचे चार कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानात परत देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते. पोलिसांनी अधिक तपास करून या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 4.5 लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे 19 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *