लांछनास्पद!मालमत्तेसाठी नातवाने केले आजीच्या मृतदेहाचे नऊ तुकडे, ओमारोपी जेरबंद
- क्राईम
- September 8, 2022
- No Comment
मुंढवा: पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खूनाचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.मालमत्तेसाठी एका नातवानेच आजीचा खून केला.त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे नऊ तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले.त्यानंतर आजी बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरभर लावले.परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली.
उषा विठ्ठल गायकवाड (वय 62) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.पोलिसांनी याप्रकरणी साहिल उर्फ गुड्डू संदीप गायकवाड (वय 20) आणि संदीप विठ्ठल गायकवाड या दोघा बाप- लेकांना अटक केली आहे.गायकवाड यांच्या मुलीने या प्रकरणी तक्रार दिली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उषा गायकवाड या सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांनी मुंढवा परिसरात जागा घेऊन घर बांधले होते.निवृत्त झाल्यानंतर त्या मुलगा, नातू आणि सुनेसोबत राहत होत्या.आपल्या नातवाला त्यांनी हात उसने पैसे दिले होते.या पैशावरून आजी आणि नातू यांच्यात अनेकदा वाद झाले होते.वादातून उषा गायकवाड यांनी साहिल आणि त्याचे वडील यांना घर सोडून जाण्यास सांगितले होते.त्यामुळे आरोपी साहिल त्यांच्यावर चिडून होता.याच रागातून त्याने पाच ऑगस्ट रोजी गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी उषा वापरत असलेल्या मोबाईल त्यांच्या कासेवाडी परिसरात ठेवून दिला.
त्यानंतर आरोपी मंगळवार पेठेत गेला आणि झाडे कापण्याचे इलेक्ट्रिक कट्टर घेऊन आला. त्याच्या सहाय्याने त्याने उषा यांच्या शरीराचे नऊ तुकडे केले.ते वेगवेगळ्या पोत्यात भरून वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले.दरम्यान उषा गायकवाड बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलीने दिली होती.तसेच त्यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाले असावे अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली होती.त्यानंतर पोलिसांनी नातू आणि मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी आणि त्यांच्या टीम ने केली.