मध्यरात्री दरोडाच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांची टोळी गजाआड, यवत पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मध्यरात्री दरोडाच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांची टोळी गजाआड, यवत पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

यवत: यवत पोलिसांनी मांडवगण फराटा येथे मध्यरात्री दरोडाच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एकूण 13 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.

आज मंगळवारी 6 सप्टेंबरला पहाटे 3 वा. पोलीस नाईक सोनवणे व पोलीस नाईक कापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम दरोडाच्या तयारीत केडगाव चौफुला येथे एकत्र जमलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ती माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोसई नागरगोजे यांना कळविली. त्यानंतर लगेच केडगाव चौफुला येथे जाऊन व्युहरचना आखुन काही इसम दरोडाच्या तयारीत असताना एकूण सहा इसमांना जागेवरच पकडण्यात आले.

या इसमांच्या ताब्यात असलेली एक एक्टिवा मोटरसायकल व तिच्या डिक्की मध्ये असलेला एक कोयता, एक मोटर सायकल, एक लोखंडी कटावणी, एक पक्कड, एक मिरची पावडरची पूड व एक बॅटरी एकूण 1 लाख 15 हजार 300 किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलेे आहे.

त्या इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुनील लोणी वय 22 वर्षे व सौरभ शिंदे वय 24 वर्षे, दोघेही रा. चिंचवड बालाजी नगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, राहुल आगम, वय 21 वर्षे, रा. दिघी आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे, अभिषेक चौधरी वय 22 वर्षे व राहुल चव्हाण, दोघेही रा. केडगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे, विकास सानप, वय 19 वर्षे, रा. फरांडे नगर दिघी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भादवि कलम 399 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे गुन्ह्याचे बाबत अधिक तपास केला असता त्यांनी मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे 31 ऑगस्टला रात्री तेरा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे करीत आहेत.

सदरची कारवाई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस नाईक गणेश सोनवणे, पोलीस नाईक विकास कापरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भापकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गडदे, पोलीस मित्र राजेंद्र अडागळे, रामा पवार यांनी केली आहे.

 

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *