गणेश विसर्जनादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल

गणेश विसर्जनादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल

पिंपरी-चिंचवड: चिंचवडमध्ये गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

याबाबत आनंद भोईटे (पोलीस, उप-आयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर) यांनी आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, इत्यादी) व्यतिरिक्त इतर वाहनांना हे नियम लागू असतील.

चिंचवडमधील अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई पुणे हायवे रोडने इच्छित स्थळी जावे.

दळवी नगर ब्रिजकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी एस के एस टोकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे.

वाल्हेकर वाडी टी जंक्शन कडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी वाल्हेकर वाडी जुना जकात नाका येथून डावीकडे वळून जय शाळेपासून बिजलीनगर अथवा एस के एस मार्गे खंडोबा माळ मार्गे इच्छित स्थळी जावे. लिंक रोड वरून चाफेकर चौकातील पीएमटी बस स्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. लिंक रोडने येणाऱ्या वाहन चालकांनी डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळे जावे.

भुई अळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने केशवनगर मार्गे याची स्थळी जातील.

चिंतामणी चौक वाल्हेकर वाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंचा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीत गणपती विसर्जन व मिरवणूक असल्याने 9 सप्टेंबरला दुपारी 3 ते मध्यरात्री 12 पर्यंत वरील प्रमाणे वाहतूक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *