- September 15, 2022
- No Comment
रावेत:चार किलो गांजासह तरुणाला अटक
रावेत:आमली पदार्थ विरोधी पथकाने चार किलो गांजा सह एका तरुणाला अटक केले आहे. ही कारवाई रमाबाईनगर शिंदेवस्ती येथे करण्यात आली.
मोहम्मद राजू नसरुद्दीन अली (वय 27, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यासह ओटास्कीम, निगडी येथे राहणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी मोहम्मद याने गांजा बाळगला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद याच्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांना एक लाख 950 रुपये किमतीचा चार किलो 38 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. आरोपी मोहम्मद याने हा गांजा ओटास्किम येथे राहणाऱ्या एका महिलेकडून आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.