- September 15, 2022
- No Comment
चिंचवड येथे अमानुष मारहाण प्रकरणी त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात
चिंचवड: त्रीकुटांनी 32 वर्षीय इसमाला जिवे मारण्याच्या उद्देशान डोळ्यात चटणी टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. ही घटना प्रेमलोक पार्क चिंचवड येथे घडली.
विशाल अरुण कसबे (वय 32, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल यांचा भाऊ छतु अरुण कसबे (वय 40) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम गायकवाड, अबीर गायकवाड, एक महिला (सर्व रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कसबे यांचे एका मुलीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. त्या रागातून आरोपींनी विशाल यांना प्रेमलोक पार्क येथे बोलावून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.