- September 15, 2022
- No Comment
गाडीच्या शोरूम मधून दोन लाख लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वाकड: वाकड येथील गाडीच्या शोरूम मधून दोन लाख रुपयांची चोरी झाली आहे. ही घटना बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये घडली.
राहुल दत्तात्रय खांदवे (वय 47, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये शनिवारी (दि. 10) रात्री साडेसात ते मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कॅश विभागातून दोन लाख 15 हजार पाच रुपये रोख रक्कम आणि हिशोबाचे व्हाउचर चोरून नेले.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.