- September 16, 2022
- No Comment
बोगद्यात ट्रक पलटी ड्रायव्हरची ओळख अद्याप अस्पष्ट
खंडाळा: खंडाळा घाटातील बोगद्यात ट्रक पलटी झाल्याने ड्राइव्हर जखमी झाला आहे. ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने ट्रक प्रथम दुभाजकाला धडकला व नंतर पलटी झाला. अशी माहिती लतीफ मुजावर, पोलीस उपनिरीक्षक, खंडाळा पोलीस चौकी यांनी दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक खंडाळा बोगद्यातून जात होता. ड्रायव्हरचा ताबा या ट्रक वरून सुटल्याने तो प्रथम दुभाजकाला धडकला व नंतर पलटी झाला. क्रेन बोलावून त्या ट्रकला सरळ करण्यात आले व त्यामध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आले. या अपघातात ड्रायव्हरचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ड्रायव्हरला रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याने त्याचे नाव कळू अदयाप शकले नाही.