• September 25, 2022
  • No Comment

एनआयए ची राज्यात ठिकठिकाणी छापेमारी, दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारे सोळा जण ताब्यात

एनआयए ची राज्यात ठिकठिकाणी छापेमारी, दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारे सोळा जण ताब्यात

राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू सुरू केली आहे.

महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोंडवा भागातील PFI कार्यलयावर छापेमारी केली आहे. पुण्यात PFI आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे. एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला

आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. त्याशिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले.

मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (153 अ, 121 अ, 109, 120 ब) आणि यूएपीए कलम 13(1) (ब) मध्ये अंतर्गत गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे. आणखी काही जिल्ह्यांमध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे.

एनआयए, ईडीसह स्थानिक तपास यंत्रणांकडून देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. केरळमध्येच 50 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापेमारी सुरू आहे. काही राज्यांमध्ये पीएफआयचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे.

 

 

Related post

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर पिस्टलातून गोळीबार करुन रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन तिची तोडफोड करण्यात आली. वाघोली पोलिसांनी…
सराईत गुन्हेगार  कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत  पुण्यात गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सराईत गुन्हेगार कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत पुण्यात गांजा घेऊन…

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. साहिल विनायक जगताप (वय २८, रा.…
हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केल आहे. साहिल मेहबूब शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *