- September 25, 2022
- No Comment
बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक,एकविस लाखाला घातला गंडा, चार जणांवर गुन्हा दाखल
तळेगाव: बनावट बँक खाते उघडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे. चार जणांनी मिळून बजाज फायनान्स कंपनीची सुमारे 21.50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत अमित साळवे, वय 31 वर्षे, रा. मु चिखलसे पोस्ट कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रणजीत कोरेकर, संजयकुमार पटले व त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 406, 420, 465, 408, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 ऑगस्ट 2021 ते 21 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. आरोपींनी वेगवेगळ्या बँकेमध्ये खोटे ऍड्रेस प्रूफ व बनावट कागदपत्रे देऊन बँक अकाउंट ओपन केले. तसेच कोहिनफाई कंपनीचे चौघांचे बनावट ओळखपत्रे तयार केली. त्यानंतर आयडीबीआय बँक व युनियन बँक येथे तुकाराम शिंदे व स्वप्निल पडीले यांच्या नावे बनावट बँक अकाउंट उघडून त्याद्वारे बजाज फायनान्स कडून मोबाईल होम थिएटर, घरगुती वस्तू व वैयक्तिक लोन घेऊन बजाज फायनान्स कंपनीची तळेगाव दाभाडे येथील शाखेचे 21.50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.