• September 25, 2022
  • No Comment

अपहरण करून एकाला गंभीर जखमी केल्याने पाच टाळकी गजाआड

अपहरण करून एकाला गंभीर जखमी केल्याने पाच टाळकी गजाआड

चिंचोली: एका व्यक्तीचे अपहरण करून गंभीर जखमी केल्याने पाच जणांना अटक करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी 20 सप्टेंबरला रात्री 10 वा. च्या सुमारास चिंचोली गावात घडलेली आहे.

याबाबत महेश यमगड्डी, वय 22 वर्षे, रा. भैरवनाथ मंदिरामागे चिंचोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी देऊळ पोलिसांना दिली आहे. राजू देवरमणी, वय 49 वर्षे, अक्षय देवरमणी, वय 24 वर्षे, शिवराज देवरमणी, वय 58 वर्ष, वैभव नाईक, वय 30 वर्षे, दीपक सौदे, वय 37 वर्षे, सर्व रा. गांधीनगर देहूरोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुणाल कटारे हे या प्रकरणात सहावा आरोपी आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 364, 307, 143, 144, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार,आशिष देवरमणी याने वेफर्स घेऊन आत्महत्या केली होती. याचा मनात राग धरून मयत देवरमणीचे नातेवाईक या प्रकरणातील आरोपी रिक्षा मधून फिर्यादीच्या राहत्या घरी आले. त्या ठिकाणी फिर्यादीला फिर्यादीचे भाऊजी तायप्पा यांनी बाहेर बोलाविल्याने फिर्यादी बाहेर आले असता आरोपी राजू देवरांनी याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालून जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व त्यानंतर तोही स्वतः रिक्षात बसला. त्यानंतर आरोपी अक्षय देवरमणी, शिवराज देब्रम्हणी दिपक सौदे व कुणाल कटारे हेही त्या रिक्षात बसले.

तेव्हा फिर्यादीचे भाऊजी तायप्पा व फिर्यादीची आई हे त्यांना आडविण्यासाठी आले असता आरोपींनी फिर्यादीची भाउजी व आई यांना ढकलून दिले. आरोपी वैभव नाईक ती रिक्षा चालवीत देहू रोडच्या दिशेने निघाला. रिक्षात बसलेले सर्वजण फिर्यादीला म्हणाले की, तुझ्यामुळे आमचा आशिष गेला तुला जीवंत सोडत नाही तुझा मर्डरच करतो असे म्हणत फिर्यादीला हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली.त्यामुळे फिर्यादी रक्त बंबाळ झाले. आरोपी कुणाल कटारे याने त्याच्या जवळील सुरा काढून फिर्यादीला जीवे मारण्यासाठी मारला परंतु फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर फिर्यादीला सेंट्रल चौक देहूरोड येथे दिशातून रस्त्यावर ढकलून देऊन सोडून निघून गेले.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *