• October 10, 2022
  • No Comment

भंगार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या त्रिकुटांवर गुन्हा दाखल

भंगार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या त्रिकुटांवर गुन्हा दाखल

म्हाळुंगे: भंगार व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निघोजे येथील शारदा मोटर्स या कंपनीत घडली.

अब्दुलरब अदिलसुल्ला शाह (वय 35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर मोहिते, राणा दौंडकर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भंगार व्यावसायिक आहेत. ते निघोजे येथील शारदा मोटर्स या कंपनीतील भंगार मटेरियल खरेदी करतात. कंपनीतून भंगार उचलण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. तसेच, फिर्यादी यांच्या ट्रकवरील चालक प्रकाश लेबर हयात समशुल इस्लम शहा व बरकतअली जवाहरअली शहा यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Related post

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर पिस्टलातून गोळीबार करुन रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन तिची तोडफोड करण्यात आली. वाघोली पोलिसांनी…
सराईत गुन्हेगार  कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत  पुण्यात गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सराईत गुन्हेगार कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत पुण्यात गांजा घेऊन…

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. साहिल विनायक जगताप (वय २८, रा.…
हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केल आहे. साहिल मेहबूब शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *