- October 10, 2022
- No Comment
बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्या सावकाराला अटक
चिंचवड: चिंचवड येथे बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्या सावकाराल चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने 6 लाख रुपये 10 टक्के व्याजाने कर्ज देऊन कर्जदाराचे 27 लाख 60 हजार रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली होती.
या प्रकरणी सचिन प्रकाश ढवळे (वय 40 रा.आकुर्डी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दिपक वाल्मीक सुर्यवंशी (वय 35 रा.चिंचवड) याला पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 2015 मध्ये आरोपीकडून 10 टक्के व्याजदराने 6 लाख रुपये घेतले होते. हे कर्ज 15 सप्टेंबर 2022 पर्यंत परत करायचे होते. यावेळी आरोपीला सर्व रोख रक्कम देऊनही आरोपीने फिर्यादी यांचे बँक खात्याचे चेक बळजबरी घेऊन एनएफटीद्वारे असे एकूण 27 लाख 60 हजार रुपये घेतले तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या नावे असणारे देहुगाव येथील तीन फ्लॅट नोटरी करून स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत.
तसेच व्याजाचे पैशांची मागणी करत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकीदेतहोता. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.