चुहा गँग टोळीवर मोक्का,भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
कात्रज: कात्रजच्या चुहा गँग टोळीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी मोक्का अतंर्गत कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी गँगचा टोळी प्रमुख व त्याच्या दोन साथीदाराला अटक केली आहे.
टोळी प्रमुख ईस्माईल मौलाली मकानदार (वय 26 रा.कात्रज), जावेद मेहबुब मुल्ला (वय 27 रा. कात्रज), तौसिफ उर्फ मोसिन चुहा जमिर सैय्यद (वय 28 रा.कात्रज) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कात्रज व आसपासच्या परिसरात संगठीतरित्या गुन्हेगारी करत होते. टोळीच्या वर्चस्वासाठी परिसरात खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, जमाव जमवून दहशत पसरविणे यासारखे गंभीर गुन्हे करत होते. तडीपार केले तरी परिसरात येऊन पुन्हा-पुन्हा गुन्हे केल्याने अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढिल तपास स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करत आहेत. मोक्का अतंर्गत केलेली ही चालू वर्षातील आयुक्तालयाची 31 वी कारवाई आहे.