• November 13, 2022
  • No Comment

अवैध गुटखा वाहतूक करणा-या इसमांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

अवैध गुटखा वाहतूक करणा-या इसमांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    *सविस्तर वाचा*👇👇

    खंडणी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार
    पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन गाड्यांमधून बंदी असलेला
    गुटख्याची वाहतूक केली जात असून सदरच्या गाड्या या शिवाजीनगर कोर्टाच्या मागील बाजूस कॅनरा
    बँकेच्या जवळ उभ्या आहेत.
    प्राप्त बातमी वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे


    शहर कडील पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशियत गाडी इट्रिगा व व्हॅगनार या
    गाड्या ताब्यात घेवुन महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला केशरयुक्त विमल पान मसाला, तंबाखू असा एकूण ५
    लाख ४ हजार रूपयांचा सुगंधित गुटखा / तंबाखू व सदरच्या दोन्ही गाड्या असा एकूण १८ लाख ४ हजार
    रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    त्याप्रमाणे संजय हनुमंत ओरसे, वय ३५ वर्षे, राहणार जनवाडी, पुणे व विनोद
    जयवंत ढोले, वय ३९ वर्षे, रा. सदर यांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे, गुन्हा दाखल करून पुढील तपास पोंउनि विकास जाधव, खंडणी विरोधी
    पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

    करत आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *