• November 12, 2022
  • No Comment

पुण्यात दिवसाढवळ्या दरोडा मार्केटयार्ड परिसरात 28 लाख लंपास

पुण्यात दिवसाढवळ्या दरोडा मार्केटयार्ड परिसरात  28 लाख लंपास

    पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घडना घडली आहे. गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लंपास करुन चोर पळून गेले आहे. ही घटना दुपारी घडली आहे. घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय पोलिसांसमोर नवं आव्हान यानिमित्तानं उभं राहिलं आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास पाच ते सहा आरोपी हे पी एम अंगडिया या कार्यालयात आले होते. हे कुरिअरचं कार्यालय असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि पैसे लुटून फरार झाले आहेत. तक्रारदार हे रोज प्रमाणे सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम तपासली होती. काही वेळाने अचानक अज्ञात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. आरोपींनी तक्रारदाराला बंदूक दाखवली. याचवेळी आरोपींनी तक्रारदाराला कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि पैसे घेऊन लंपास झाले.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *