पुणे कोंढवा: दोन लाखांहून अधिक किमतीचे बनावट पनीर जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
कोंढवा: पुण्यातील कोंढवा परिसरात अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख रुपयांहून अधिकचे बनावट पनीर जप्त केले आहे. अशाप्रकारे बनावट पनीरची निर्मिती करणाऱ्यांवरील ही 15 दिवसांतील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
अन्न व औषध प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात असणाऱ्या सद्गगुरूकृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कारखान्यामध्ये बनावट पनीरचं उत्पादन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी तब्बल 2 लाख रुपयांहून अधिक किमतीचे बनावट पनीर जप्त केले आहे. बनावट पनीरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर अशा प्रकारे मोठी कारावाईची 15 दिवसांतील तिसरी कारवाई आहे.
या छाप्यात 2,39,800 रूपये किमतीचे 1199 किलो पनीर, 18 लाख रूपये किमतीचे 4,073 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 1,53,765 रूपये किमतीचे 1048 किलो आर बी डी पामलीन तेल असा एकूण 22, 65, 171 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.