• September 27, 2022
  • No Comment

आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत सांगत फेसबुक फ्रेंडकडून ५८ लाख लुबाडले

आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत सांगत फेसबुक फ्रेंडकडून ५८ लाख लुबाडले

हिंजवडी: भारतात पर्यटनासाठी आलो असून आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत. त्यामुळे विमानतळावर पकडले असल्याचे सांगत फेसबुक फ्रेंडकडून तब्बल 58 लाख 78 हजार उकळल्याची घटना बावधन येथील एका नागरिकासोबत घडली आहे. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत फेसबुक आणि ओनलाईन माध्यमातून घडला.

शाम अरविंद ओझरकर (वय 54 , रा. पाटीलनगर, बावधन) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. विल्यम अल्बर्ट, 0589200100000661 खातेधारक, 7042136239, 8130318145 या मोबाईल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विल्यम याच्या सोबत फिर्यादी ओझरकर यांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. विल्यम याने तो पर्यटनासाठी भारतात आला असून त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक डॉलर आहेत. त्यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला ओझरकर यांच्या मदतीची गरज आहे, असे सांगून त्याने ओझरकर यांची दिशाभूल केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल 58 लाख 78 हजार 700 रुपये घेत फसवणूक केली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *