• October 6, 2022
  • No Comment

विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

    सासवड: पुण्यातील सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. नारायणपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला हा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली.

    यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

    गौरव ललवाणी (वय 19) आणि रचित मोहता (वय 18) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर इतर पाच जण जखमी आहेत.. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर येथील सासवड कापूरहोळ रस्त्यावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवले. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की चार चाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडक देत चार वेळा पलटी झाली.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *