• October 6, 2022
  • No Comment

पिकांची नासधुसकरत शेतकरी महिलेला धमकी

पिकांची नासधुसकरत शेतकरी महिलेला धमकी

    हिंजवडी: पिकांची नासधुस करत शेतकरी महिलेला ही आमची जागा आहे इथून निघून जा नाही तर तुरुंगात टाकेन अशी धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार कासारसाई येथे घडला.

    याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रामचंद्र साधू गायकवाड,अजित रामचंद्र गायकवाड, शाम अंकुश शितोळे व इतर 10 ते 12 जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शेतात गेल्या असता आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीच्या शेतातील पत्र्याची खोली व त्यातील साहित्य जाळून टाकले. तसेच शेतातील स10 ते 12 गुंठ्यातील सोयाबीनचे पीक नासधूस केले.तसेच यावेळी ही जमीन आमची असून तू ईथून निघून जा नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. तकुला सहा महिने तुरुंगात टाकेन व तुझ्या कुटुंबाला पॅरेलेस करेन अशी धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *