- October 6, 2022
- No Comment
ट्राफिक वॉर्डनला मारहाण, आरोपी गजाआड

चिंचवड: रस्त्याच्या मधोमध लावलेली गाडी काढण्यास सांगितले म्हणून अरेरावी करत ट्राफिक वॉर्डनला मारहाण करणाऱ्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार चिंचवड येथील जैन शाळेच्या कोपऱ्यावर घडला.
हंसराज दगडु ठाकरे (वय 38 रा.चिंचवडे नगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ट्राफिक वॉर्डन शरद जयहिंद बंडगर (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जैन शाळा येथे शाळा सुटल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते. आरोपीने त्याची गाडी (एमएच14 ईयु0048) ही जुना जकात नाका चौकात ब्रीजच्या खाली रोडच्या मधोमध उभा केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती.यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला गाडी काढा त्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे सांगितले. यावेळी आरोपीने गाडी नाही घेत पुढे, काय करायचे ते कर असे उद्धट उत्तर दिले.यावेळी फिर्यादी यांनी आरोपीच्या गाडीचा फोटो काढला.

याचा राग येवून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची कॉलर पकडून चापटा व हातातील कडे मारून जखमी केले. यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाख केला आहे.




