• November 20, 2022
  • No Comment

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन, पहा सविस्तर

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन, पहा सविस्तर

     

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेकरीता प्रती शिधापत्रिका १५ किलो गहू, २० किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू, ३ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी १ किलो गहू व ४ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रती लाभार्थी दोन्ही योजनेचे मिळून १० किलो धान्य लाभार्थ्यास मिळते.

    या योजनांचे सप्टेंबरचे धान्य घेतले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर २०२२ च्या धान्यासोबत सप्टेंबरचे धान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांनी धान्य प्राप्त करुन घ्यावे व दोन्ही योजनांचे धान्य घेतल्याबद्दल स्वतंत्र पावती स्वस्त धान्य दुकानदारांकडून घ्यावी.

    लाभार्थ्यांना योजनानिहाय मिळणाऱ्या धान्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास मिळणार आहे, असेही माने यांनी कळवले आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *