• November 20, 2022
  • No Comment

चारित्र्याच्या संशयावरून विभक्त पत्नीचा गळा चिरला

चारित्र्याच्या संशयावरून विभक्त पत्नीचा गळा चिरला

     

    चंदन नगर: विभक्त पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील चंदन नगर परिसरात 16 नोव्हेंबर रोजी वडगाव शेरी येथील भाजी मंडई जवळ हा प्रकार घडला. चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शिवशंकर शौरप्पा मेनसे (वय 30) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेम संबंध आहेत आणि त्याला दारूचे व्यसन असल्याने फिर्यादी मागील तीन वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहतात. दरम्यान आरोपीने फिर्यादीला जेवणाचा डबा घेऊनच सांगितले. त्यानंतर चंदन नगर परिसरातील भाजी मंडई परिसरात त्याने आपल्या ताब्यातील मिनी बसमध्ये फिर्यादीला बोलावले. त्यानंतर रोमान्स करण्याच्या पाहण्याने फिर्यादीला बसच्या मागील भागात नेले.

    त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या चरित्रावर संशय घेत तुझे दुसऱ्याच माणसासोबत अफेअर आहे. तू मोबाईलवर चांगले स्टेटस ठेवते असे म्हणून धारदार लोखंडी कटरने फिर्यादीच्या गळ्यावर वार केले. या घटनेत फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *