• November 20, 2022
  • No Comment

चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

     

    पुणे: पुणे पोलीस दलात नेमणूक असलेला एका पोलीस कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    दिनकर बबन हनमघर (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस आहेत. याप्रकरणी त्यांच्या 39 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे 2010 साली लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून ते आजतागायत आरोपीने पत्नीला तू मला आवडत नाही असे म्हणून तिचा छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पैसे चोरल्याचा आरोप करून वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत फिर्यादीच्या मुलाला देखील मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *