- November 20, 2022
- No Comment
व्हॉटसअप वरून धमकी, एक लाखांच्या खंडणीची मागणी
चाकण: व्हॉटसअप वर मेसेजकरून जीवे मारण्याची धमकी देत 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कालिदास बबन शिंदे (वय 36 रा. खालुंब्रे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्हॉटसअप क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीची सर्व माहिती काढली व नंतर त्याने फिर्यादी यांच्या व्हॉसअप क्रमांकावर धमकीचे मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मॅसेजमध्ये म्हटले की, तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, पोकसेनचे मशीन जाळून टाकीन,हे न को असेल तर 1 लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.