• November 20, 2022
  • No Comment

ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धाची सत्तावीस लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धाची सत्तावीस लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     

    रहाटणी: फॉरेक्स ट्रेडिंग केल्यास भरपूर फायदा होतो, असे सांगत अनोळखी व्यक्तींनी वृद्ध नागरिकाला गुंतवणूककरायला लावून 26 लाख 91 हजाररुपयांची फसवणूक केली आहे.हा प्रकार एप्रिल 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रहाटणी येथे घडला.

    विश्वनाथ मोहन गोसावी (वय 72, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7047325915, 8710046005, 7430972280, 7047326015, 8710041508, 8670266423 मोबाईल क्रमांक धारक आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना फोनवरून संपर्क केला. ऑटो एफएक्स ट्रेड कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून ऑनलाईन ट्रेड केल्यास जास्त फायदा होतो असे सांगितले. नकली वेबसाईट तयार करून त्यावर विश्वनाथ गोसावी यांच्या मुलाला अकाऊंट तयार करण्यास लावले. ए यु स्मॉल फायनान्स बँक खात्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी 16 लाख 91 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. फॉरेक्स ट्रेडिंगच्या आयडीवर विश्वनाथ गोसावी यांना पाच लाख 32 हजार 547.80 यु एस डॉलर (चार कोटी भारतीय रुपये) एवढा फायदा झाल्याचे आरोपींनी दाखवले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये रोख देण्यास भाग पाडून विश्वनाथ गोसावी यांची 26 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *