- October 14, 2022
- No Comment
विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
आळंदी: तुझे पगाराचे पैसे दे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ करणाऱ्या पती व त्याच्या कुटुंबीयावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून आजपर्यंत आळंदी रोड येथे घडला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पुष्पेंद्र गिरीराज चौधरी (वय 27) व इतर सहा यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या पगारीचे पैसे दे म्हणत पती व त्यांच्या सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांचा शारीरिक वमानसीक चळ केला. तसेच शिवीगाळ करत क्रुरवागणूक दिली.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
