- October 14, 2022
- No Comment
दोन टोळक्यांकडुन एक लाखांचा अफू जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
काळेवाडी: अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी येथे कारवाई करून पॉपी स्ट्रॉ (अफूच्या बोंडांचा चुरा) आणि अफू असा एक लाखाचा अंमली पदार्थ जप्त केला.
नरेश बाबूराम बिष्णोई (वय 21, रा. काळेवाडी, मूळ रा. राजस्थान), हनुमान बिष्णोई या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश याने हनुमान याच्याकडून पॉपी स्ट्रॉ आणि अफू आणला. हा अफू तो काळेवाडी परिसरात विक्री करणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 20 हजार 385 रुपयांचा एक किलो 359 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ, 76 हजार रुपयांचा अफू, 65 हजारांची दुचाकी, 18 हजारांचा मोबाईल असा एक लाख 79 हजार 385 रुपयांचा ऐवज जप्त केला.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.