• December 23, 2024
  • No Comment

रेशनकार्डशिवाय मिळणार स्वस्त धान्य, सरकारकडून नियमात मोठा बदल

रेशनकार्डशिवाय मिळणार स्वस्त धान्य, सरकारकडून नियमात मोठा बदल

सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही.

डिजिटल पद्धतीन रेशन कार्डशिवाय लोकांना सेवांना लाभ घेता येणार आहे.

सरकारने रेशन मिळवण्यासाठी ॲप लाँच केले आहे. Mera Ration 2.0 हे ॲप वापरून तुम्ही तुमचं रेशन मिळवू शकता. म्हणजेच आता लोकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका ॲपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल.

केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन 2.0 ॲपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे.

भारत सरकारच्या या ॲपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतात. या ॲपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचं रेशन सहज मिळू शकेल. या ॲपमुळे रेशन घेण्यासाठी प्रत्येक वेळी रेशनकार्ड बाळगण्याची गरज दूर होणार आहे.

मेरा राशन अॅप 2.0 कसे वापरावे?

1. सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप डाउनलोड करावे लागेल.
2. Google Play Store किंवा Apple Store वरून मेरा राशन 2.0 ॲप डाउनलोड करू शकता.
3. मेरा राशन 2.0 ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
4. OTP पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा.
5. या स्टेप्सनंतर तुमच्या रेशनकार्डची डिजिटल कॉपी ओपन होईल. ही प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.

Related post

दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट सरकार कडून मुभा

दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट…

पुणे: नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता…
मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

हडपसर: पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल, घरफोडी, बस मध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हडपसर परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल…
सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ ची उल्लेखनीय कामगिरी

सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, पिंपरी-चिंचवड…

पिंपरी: महिलेला मारहाण करून सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याच्या पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. सलग ७२ तास सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी चोरट्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *