• October 14, 2022
  • No Comment

महापालिकेत एकुण ४ हजार ३६८ पदे रिक्त!

महापालिकेत एकुण ४ हजार ३६८ पदे रिक्त!

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल 4 हजार 368 पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. ‘ड’ श्रेणीतील सफाई व इतर संवर्गात सर्वाधिक 2 हजार 182 पदे रिक्त आहेत. महापालिका प्रशासनाने माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी लेखी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत.

तसेच दरमहा किमान 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल 4 हजार 368 इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाद्वारे कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिकेच्या प्रशासन विभागाकडे 1 सप्टेंबर 2022 रोजी महापालिकेतील आकृतीबंधाच्या मंजुरीनुसार विविध विभागातील ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीतील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती मागितली होती. प्रशासन विभागाने खैरनार यांना ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीतील 31 मार्च 2022 पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीत एकूण 356 संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या 11 हजार 513 इतकी आहे. त्यापैकी 7 हजार 124 इतकी पदे भरली आहेत. तर, 4 हजार 368 इतकी पदे रिक्त आहेत. ‘अ’ श्रेणीत एकूण 121 संवर्ग आहेत. त्यात 281 पदे मंजूर असून त्यापैकी 165 पदे भरलेली तर 116 पदे रिक्त आहेत.

‘ब’ श्रेणीत एकूण 47 संवर्ग आहेत. त्यात 324 पदे मंजूर असून त्यापैकी 207 पदे भरलेली आहेत. तर, 117 पदे रिक्त आहेत. ‘क’ श्रेणीत एकूण 154 संवर्ग आहेत. त्यात 5 हजार 350 पदे मंजूर असून त्यापैकी 3 हजार 397 पदे भरलेली आहेत. तर, 1 हजार 953 पदे रिक्त आहेत. ‘ड-इतर’ श्रेणीत एकूण 27 संवर्ग आहेत. त्यात 2 हजार 965 पदे मंजूर असून त्यापैकी 1 हजार 724 पदे भरलेली आहेत. तर, 1 हजार 241 पदे रिक्त आहेत. ‘ड-सफाई संवर्ग’ श्रेणीत एकूण 7 संवर्ग आहेत. त्यात 2 हजार 593 पदे मंजूर असून त्यापैकी 1 हजार 652 पदे भरलेली आहेत. तर, 941 पदे रिक्त आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिकेने सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रतिकार केला असला, तरीही रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. महापालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने हि रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.

Related post

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी किंवा मृत झाल्यास… देणार आर्थिक मदत

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी…

पुणे: पुणे शहरात नैसर्गिक दुर्घटना किंवा प्राण्यांच्या हल्याच जखमी झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात झाड पडून अथवा…
गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *