- October 14, 2022
- No Comment
दोन लाखांची घरफोडी, चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल
वडगाव मावळ: बंद घराचा दरवाच्याचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील 2 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर हात साफ केला आहे. ही घटना वडगाव मावळ येथील ढोरे वाडा येथे घडला आहे.
शैलेंद्र रामचंद्र ढोरे (वय 51 रा. वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बंद घराचा दरवाज्याचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सोन्याची साखळी,सोन्याची अंगठी, कानातले टॉप्स, कानातली बाळी असा सुमारे 19 ग्रॅम वजनाचे 1 लाख 97 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत. त्यानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.