- October 14, 2022
- No Comment
विनाकारण तरुणावर लोखंडी कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी: काहीही कारण नसताना तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
आतुल लालचंद वैद (वय 19 रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून किरण डोंगरे व सुमित (पूर्णनाव माहिती नाही) दोघे राहणार मिलींदनगर, पिंपरी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीही कारण नसताना आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता म्हणून आरोपीला फिर्यादीने विचारले असता आरोपींनी फिर्यादीला तुला माज आला आहे का म्हणत लोखंडी कोयत्याने डाव्या पायाच्या पोटरीवर मारून जखमी केले.
यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.